वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे अश्लील छायाचित्र व्हाट्सअपवरून व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन तरुणीवर एका भावी शिक्षकाने बलात्कार केल्याची घृणास्पद घटना घडली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीस शनिवारी अटक करण्यात आली. परसराम मन्साराम बिघोत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर तरुणी हि संजरपूरवाडी येथील रहिवाशी असून ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती आरोपीची पीडित तरुणीशी ओळख झाल्यानंतर तो सतत तिची छेड काढत होता. माझ्यासोबत फोटो काढ नाहीतर तुझ्या आई वडील व भावाचा काटा काढेल अशी धमकी आरोपीने तरुणीला दिली यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने त्याचायसोबत फोटो काढले. यानंतर काढलेले फोटो व्हाट्सअपवरून व्हायरल कारेन अशी धमकी देत ८ फेब्रुवारी रोजी तरुणीला नालेगाव येथील एका मित्राच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेच्या तक्ररीवरून आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने आरोपीस १८ फेब्रुवारी पर्यन्त पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भगवान डांगे करत आहेत.